मुंबई

मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात

CD

मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात
घाटकोपर, ता. २० (बातमीदार) ः अंधेरी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स येथे १८ व १९ एप्रिलला आयोजित करण्यात आलेली मुंबई जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा उत्साहात आणि दिमाखात पार पडली. या स्पर्धेत सुमारे ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या वेळी सुमारे १२ ते १३ अकादमींचे प्रशिक्षकही उपस्थित होते. स्पर्धेत फाईट आणि पुमसे या प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपली कौशल्ये सादर करीत उत्कृष्ट कामगिरी केली. एकूणच स्पर्धेचा स्तर उच्च दर्जाचा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
ओव्हरऑल चॅम्पियनशिपमध्ये जयेश ट्रेनिंग क्लासेस यांनी प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले, तर सिद्धकला तायक्वांदो अकॅडमी यांनी द्वितीय स्थान मिळवले. फाईट प्रकारात एसडब्ल्यूएस यांनी प्रथम क्रमांक मिळवला. जयेश ट्रेनिंग क्लासेस द्वितीय, सिद्धकला तायक्वांदो अकॅडमी तृतीय, तर स्काय मार्शल आर्ट अकॅडमी यांनी चतुर्थ स्थान पटकावले. पुमसे प्रकारात जयेश ट्रेनिंग क्लासेस प्रथम, सिद्धकला तायक्वांदो अकॅडमी द्वितीय आणि स्काय तायक्वांदो अकॅडमी यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्व सहभागी अकॅडमींकडून कौतुक करण्यात आले. विशेषतः जयेश वेल्हाळ यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव विजय कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच अध्यक्ष सुनील यमगर यांनी सर्व विजेत्या खेळाडू, पदाधिकारी व अकॅडमी प्रतिनिधींचे अभिनंदन करीत आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT