मुंबई

सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने पोलिसांना हेल्मेटचे वाटप

CD

सेवा सहयोग फाउंडेशनतर्फे पोलिसांना हेल्मेटवाटप
रस्ता सुरक्षेसाठी ‘राइट टू सेफ्टी’ अभियान
पेण, ता. २० (वार्ताहर) : सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून रविवारी (ता. १९) पेण पोलिसांना हेल्मेटचे वाटप करून रस्ता सुरक्षेसाठी ‘राइट टू सेफ्टी’ अभियान राबवण्यात आले. या वेळी पोलिस निरीक्षक संदीप बागूल यांनी पोलिस अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा दररोज पुरेपूर वापर करावा, असे सांगितले.
ही संस्था देशभरात पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण तसेच मराठी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शाळांतील सुखसोयींसाठी काम करीत असून, फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर असंख्य पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षाकवच म्हणून हेल्मेटचे वाटप केले आहे. पेण येथील ४२ अधिकारी आणि कर्मचारी तसेच उर्वरित वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनासुद्धा हेल्मेटचे वाटप करण्यात आले आहे, असे सेवा सहयोग फाउंडेशनचे व्यवस्थापक विनय बर्वे आणि सहव्यवस्थापक गणेश संसारे यांनी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

नागपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांच्या स्थानकांसह वेळेत बदल; मध्य रेल्वेला ट्राफिक ब्लॉकचा फटका

SCROLL FOR NEXT