मुंबई

शिघ्रे ग्रामपंचायतीला क्षेपणभूमीची प्रतीक्षा !

CD

शिघ्रे ग्रामपंचायतीला क्षेपणभूमीची प्रतीक्षा
नदीच्या पुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य; रोगराई पसरण्याची भीती
मुरूड, ता. २० (बातमीदार) : मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायतीसमोर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, क्षेपणभूमीअभावी नागरिकांकडून सर्रास शिघ्रे नदीच्या पुलाखाली कचरा टाकला जात आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
केंद्र सरकारकडून स्वच्छतेवर भर दिला जात असला तरी स्थानिक पातळीवर आवश्यक सुविधा नसल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. शिघ्रे, वाणदे, नवी वाडी, आदिवासी वाडी आणि नागशेत या भागांमधून दररोज मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. पूर्वी ग्रामपंचायतीकडून कचरा संकलनासाठी घंटागाडी चालवली जात होती तसेच गट क्रमांक १५७ व १५४ मध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावली जात होती. मात्र सध्या जागेअभावी ही व्यवस्था ठप्प झाली आहे.
ग्रामपंचायतीने गावात कचरा टाकण्यास बंदी करण्यासाठी फलक लावले असून, सीसीटीव्हीच्या भीतीमुळे काही प्रमाणात नियंत्रण आले आहे. तरीही कचरा संकलनाची पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांकडून नदीपात्रात कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. पुलालगत दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
चौकट
क्षेपणभूमीअभावी व्यवस्था ठप्प
क्षेपणभूमी नसल्याने ग्रामपंचायतीची घंटागाडी सेवा काही महिन्यांपासून बंद आहे. कचरा व्यवस्थापनासाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी व अलिबाग उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जोपर्यंत योग्य जागा मिळत नाही तोपर्यंत समस्या कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT