मुंबई

महालक्ष्मी जत्रेची सांगता

CD

महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सांगता
१५ दिवसात कोट्यवधींच्या उलाढालीचा अंदाज
कासा, ता. २० (बातमीदार)ः डहाणू तालुक्यातील विवळवेढे येथील चैत्र पौर्णिमेपासून सुरू झालेल्या महालक्ष्मी जत्रेची सांगता उत्साहात झाली. हनुमान जयंतीपासून १५ दिवस चाललेल्या या जत्रेत यंदा कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
२ एप्रिलपासून सुरू झालेली जत्रा १७ एप्रिल रोजी औपचारिकरीत्या संपली, तर २० एप्रिलपर्यंत तुरळक गर्दी कायम होती. जत्रेत फुलहार, प्रसाद, मिठाई, कंदी पेढा, पाळणे, भाजीपाला, थंड पेये, मटण-चिकन, सुके मासे, मसाले, खेळणी, भांडी व औजारे अशा विविध प्रकारची शेकडो दुकाने थाटली होती. महाराष्ट्रासह गुजरात राज्यातून आलेल्या व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय झाला. शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावल्याने उलाढालीने उच्चांक गाठला.
---------------------------
स्थानिकांना रोजगार
विवळवेढे, चारोटी, कासा परिसरातील नागरिकांना जत्रेमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील हॉटेल्स व इतर व्यवसायांनाही फायदा झाला. गर्दीच्या दिवशी १.५ ते २ कोटींची उलाढाल झाली, तर सामान्य दिवसांमध्ये ७० ते ८० लाखांची उलाढाल नोंदवली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: भाजप-IT सेल भारतीय, बाकी पाकिस्तानी? हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत; अभिजित दिपकेंची सरकारवर टीका

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Maratha Reservation: मराठा आंदोलनातील ५६ गुन्हे मागे; राज्य सरकारने पुन्हा मागविली पोलिसांकडून माहिती, जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हालचाली

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहिणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

SCROLL FOR NEXT