मुंबई

बेलोशी येथे महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

बेलोशी येथे महाराजस्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) : रामराज महसूल मंडळअंतर्गत नुकतेच बेलोशी येथे महाराजस्व अभियान राबविण्यात आले. येथील विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीतील लाभार्थी नागरिकांना अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या वेळी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक कोकणे, बेलोशीचे माजी सरपंच कृष्णा भोपी, निवासी नायब तहसीलदार संदीप जाधव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अजित टोळकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी हर्षद देशमुख, महेंद्र विद्रे, अशोक वारगे, रघुनाथ नाईक, रामराजच्या मंडळ अधिकारी समिक्षा मोहिते, बेलोशीचे ग्राम महसूल अधिकारी शशीकांत कांबळे, सुडकोलीचे ग्राम महसूल अधिकारी संतोष बोडके, बोरघरचे ग्राम महसूल अधिकारी अक्षय देशमुख, चिंचोटीच्या ग्राम महसूल अधिकारी दिशा कडू, ग्रामविकास अधिकारी वेटकोळी, महसूल सेवक महेंद्र वादळ, मोहन लोभी, सदानंद पारंगे, प्राची म्हात्रे, कृषी, महसूल, भूमी अभिलेख, अशा वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी, बेलोशी ग्रामपंचायतीचे कर्मचारी, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.
शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रलंबित असलेले दाखले तसेच नागरिकांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे या शिबिरात उपलब्ध करून देण्यात आली. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कागदपत्रे थेट शिबिरातच मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमांमुळे नागरिकांना शासकीय कार्यालयांचे वारंवार फेरे मारण्याची गरज कमी होत असून, प्रशासन त्यांच्या दारी पोहोचत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांसह महसूल विभागाशी संबंधित दाखले कागदपत्रे मिळविण्याचा लाभ अशा शिबिरांतून घ्यावा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT