मुंबई

उन्हाळी सुट्टीसाठी ठाणे एसटी सज्ज

CD

उन्हाळी सुट्टीसाठी ठाणे एसटी सज्ज
अतिरिक्त फेऱ्यांसह व्यापक नियोजन

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २० : दिवाळीची सुट्टी असो, शिमगा असो वा गणेशोत्सव या काळात कोकणासह राज्यातील विविध भागात जाण्यासाठी एसटी प्रवासाला नागरीका पसंती देत आहेत. त्यानुसात यंदाच्या उन्हाळी सुट्टीत गावी जाण्यासाठी ठाणे एसटी विभागाने कंबर कसली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, योग्य व अचूक नियोजन करण्यात आले आहे. नियमित सेवेसोबतच अतिरिक्त बसफेऱ्यांची भर घालत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

उन्हाळी सुटीत शाळा-महाविद्यालये बंद असल्याने आणि ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने प्रवासाची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे विभागातील विविध आगारातून कोकण, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहरांकडे बससेवा वाढविण्यात आली आहे. वाढती प्रवासीसंख्या लक्षात घेऊन लांब पल्ल्याच्या मार्गांवर विशेष भर देण्यात आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, चिपळूण, सातारा, धुळे, जळगाव, शिर्डी, अहिल्यानगर आदी मार्गांवर नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत असल्याने त्या दिशेने जादा बस सोडण्यात येत आहेत. ठाणे, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि वाडा या आगारांमधून सेवा सुरळीत ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, एसटीच्या बसभाड्यात झालेल्या वाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक ताणही वाढला आहे. तरीही अतिरिक्त फेऱ्यांमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रवाशांनी आगाऊ नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

............................

४९९ बसफेऱ्यांचे नियोजन

१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत उन्हाळी हंगामासाठी ५७ अतिरिक्त बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय नियमित २८६ फेऱ्याही सुरू राहणार आहेत. या सर्व फेऱ्या मिळून एकूण ४९९ बसफेऱ्या कोकण, खान्देश, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध शहरांकडे धावणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ची भारतीय T20 संघात थाटात एन्ट्री! सचिन तेंडुलकरचा ३८ वर्षे जूना विक्रम मोडला जाणार

अख्खा खांब अंगावर पडला... 'उधे गं अंबे'च्या सेटवर मयुरी कापडणेचा झालेला अपघात; म्हणाली, 'कुणी माझं कानातलं काढत होतं...'

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर विकेटसाठी तरसला! शिवम दुबेच्या वादळी नेतृत्वाखाली अंधेरी आर्क्सने मुंबई गाजवली!

Investment: गुंतवणुकीचा नवा ट्रेंड! मिड आणि स्मॉल-कॅप गुंतवणुकीसाठी SIF ठरणार गेमचेंजर?

Marriage Numerology : मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघताय? 'या' मुलांकाचे लोक बनतात परफेक्ट जावई, सगळ्यांचे मन जिंकतात

SCROLL FOR NEXT