अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौरांकडून पाहणी
कचरा कमी करत पर्यावरण संवर्धन व महिला सक्षमीकरणाला चालना
जुईनगर, ता. २० (बातमीदार) : सीबीडी बेलापूर येथे केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर सुजाता पाटील यांनी पाहणी केली. त्यांनी संकलन, वर्गीकरण, पुनर्प्रक्रिया व नव्या वस्तूंच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेतली. या वेळी सलुजा सुतार, अजनी भोईर, रेखा म्हात्रे, स्वाती गुरखे, सुरेखा नरबागे, संतोषी म्हात्रे, स्मिता काळे, तपनकुमार रौत, प्रकाश सैनी, नुतन कजबजे, वैशाली कदम आदी उपस्थित होते.
महापौर पाटील म्हणाल्या की, वाढत्या कापडी कचऱ्याला आळा घालत त्याचे पुनर्प्रक्रियेद्वारे आकर्षक व उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करणारा हा उपक्रम पर्यावरणपूरक आहे. केंद्र सरकारने नवी मुंबईची निवड केल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे महिलांना रोजगार मिळून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाउंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जात आहे. सोसायट्यांतील विशेष कचरापेट्या व स्वतंत्र वाहनाद्वारे कपड्यांचे संकलन केले जाते. ‘थ्री आर’ केंद्रांतूनही वस्त्र गोळा करून प्रक्रियास्थळी आणले जाते. येथे कपड्यांचे वर्गीकरण करून त्यांच्या स्थितीनुसार प्रक्रिया केली जाते आणि अपसायकलिंगद्वारे नवीन उत्पादने तयार केली जातात.
चौकट
अपसायकलिंगमुळे कचरा नियंत्रण व रोजगारनिर्मिती
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणातील कापडी कचरा कमी होत असून, क्षेपणभूमीवरील ताण घटतो. त्याच वेळी महिलांना रोजगार उपलब्ध होऊन स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होतो. पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि महिला सक्षमीकरण यांची प्रभावी सांगड घालणारा हा उपक्रम नवी मुंबईसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.