मुंबई

लोकल ट्रेन रुळावरून घसरली

CD

लोकल ट्रेन रुळावरून घसरली
वाहतूक विस्कळित, प्रवाशांचे हाल; चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकल रुळावरून घसरली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळित होऊन कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने निघालेली लोकल सोमवारी सकाळी ८.०९ वाजता रुळावरून घसरली. या घटनेत लोकलच्या तिसऱ्या डब्याचे चाक रुळावरून घसरल्याने कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. दुर्घटनेच्या वेळी संबंधित लोकल रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मागून येणाऱ्या लोकल गाड्या एकामागोमाग रखडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सकाळच्या गर्दीच्या वेळी काही प्रवाशांनी डब्यांतून उतरून रेल्वे मार्गातून चालत जवळचे स्थानक गाठले, तर काहींनी रस्ता मार्गाचा वापर करून पुढील प्रवास केला. घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे तांत्रिक पथक, अभियंते आणि दुरुस्ती कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बिघाड दूर करण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी १०.१० वाजता घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्यात यश आले. त्यानंतर सकाळी १०.५५ वाजता लोकल वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
...
नऊ लोकल रद्द
दुरुस्तीच्या काळात १२ लोकल गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्या, तर नऊ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. साधारण १०० फेऱ्यांना विलंब झाला. त्यामुळे धीम्या आणि जलद दोन्ही मार्गांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला. धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवल्याने कोपर, मुंब्रा, ठाकुर्ली स्थानकांवर  काही काळ एकही लोकल थांबली नव्हती.  प्रवाशांनी डोंबिवली स्थानकातून जलद लोकलने प्रवास करावा. कल्याण ते दिवा यादरम्यान सर्व लोकल जलद मार्गावरून चालवल्या जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
...
दुपारपर्यंत परिणाम
या दुर्घटनेमुळे सकाळच्या वेळेत लोकल गाड्या सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागला. या विलंबाचा परिणाम दुपारी २ वाजेपर्यंत जाणवत होता.
...
चौकशीचे आदेश
घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, मोटरमन आणि गार्ड यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. अपघातग्रस्त लोकल पुढील तपासणीसाठी कारशेडमध्ये पाठविण्यात आली आहे. दुर्घटनेचे नेमके कारण चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"एकाच दिवसात आमचे दोन अपघात झाले" भाग्य दिले तू मला फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा प्रसंग

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात पालकमंत्र्यांच्या बैठकीवेळीच एसीची गळती

BMC: वाकोला नाल्यावर जलवाहिनीसाठी पूल, महापालिकेचा तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार

IPL 2026: श्रेयस अय्यरकडून 'गिफ्ट' साठी, प्रियांश आर्य व कूपर कॉनली यांनी LSG च्या गोलंदाजांना दिला चोप; काय होती अट?

IPL 2026 : सीधी बात नो बकवास! "MS Dhoni च्या फॅन्सने चापलूसी करणे सोडावे, तो आला तरी CSK च्या कामगिरीत फार फरक पडणार नाही"

SCROLL FOR NEXT