बुधवारी नवी मुंबईतील पाणीपुरवठा १२ तास बंद
तुर्भे, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विविध तांत्रिक कामे आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी बुधवारी (ता. २२) सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तब्बल १२ तास मुख्य जलवाहिनीवरील पुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
पालिकेमार्फत सीबीडी बेलापूर सेक्टर-२८ पंप हाउस येथे मॅनिफोल्ड व व्हॉल बसविणे, कळंबोली सर्कल, नेरूळ सेक्टर-१९ वंडर पार्क येथील जलवाहिनीवर व्हॉल बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासोबतच घणसोली सेक्टर-२ येथील ९०० मिमी व्यासाच्या पाइपलाइन जोडणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत मुख्य जलवाहिनीवरील पाणीपुरवठा तब्बल १२ तास बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. यामुळे बुधवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच गुरुवारी (ता. २३) सकाळचा आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असून, आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या विभागांवर होणार परिणाम
या कालावधीत बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. तसेच महापालिका क्षेत्रातील मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्या आणि सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे नोडमधील पाणीपुरवठाही बाधित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.