मुंबई

मांडवा जेट्टीवरील सुरक्षा रामभरोसे

CD

मांडवा जेट्टीवरील सुरक्षा रामभरोसे
सागरी सुरक्षा निरीक्षण पोलिस चौकी बंद; जेट्टीवर सुविधांचा अभाव
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) ः मुंबई-अलिबाग जलवाहतुकीचे मुख्य केंद्र असलेल्या मांडवा जेट्टीवर सध्या प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. सागरी सुरक्षा निरीक्षण पोलीस चौकी बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जेट्टीच्या पुलाचे काँक्रीट कोसळू लागल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबईतून अलिबागला जलवाहतुकीने रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने व संभाव्य अतिरेकी कारवाया लक्षात घेता मांडवा येथे सुरक्षा चौकी उभारण्यात आली होती. येथे प्रवाशांबरोबर त्यांच्या सामानाचीही तपासणी केली जाते, परंतु काही दिवसांपासून येथील तपासणी बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही वर्षांत सागरी मार्गावर झालेल्या अतिरेकी कारवाया लक्षात घेता, यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे प्रवासी बोलत आहेत. यासोबतच जेट्टीवर मोठ्या प्रमाणात असुविधा असल्याच्या तक्रारही पर्यटकांमधून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने मांडवा येथे गेल्या काही वर्षांपूर्वी नवीन जेट्टी उभारण्यात आली आहे. या जेट्टीचे मोठ्या थाटात उद्‍घाटनही करण्यात आले. मात्र, काही वर्षांतच निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या जेट्टीवरील पुलाच्या पिलरचे काँक्रीट आणि प्लास्टर गळून पडत असल्याने अनेक ठिकाणी पिलरमधील लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने मांडवा बंदर डेंझर झोनमध्ये आले असून, प्रवासी आणि पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. पुलाच्या दुरुस्तीकडे महाराष्ट्र सागरी मंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रवासी सुविधांचा अभाव
१ जेट्टीपासून वाहनतळ येथे ये-जा करण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, स्तनदा माता व आजारी रुग्णांच्या सेवेसाठी दोन वाहने आहेत, परंतु प्रवाशांची संख्या लक्षात घेता वाहनांची संख्या अपुरी आहे. व्हीलचेअरची सुविधा नसल्याने बोटीत चढ-उतार करताना रुग्णांचे हाल होत आहेत.
२ जेट्टीवर मोफत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. तसेच स्वच्छतागृह नसल्याने महिला प्रवाशांसह सर्वांनाची मोठी कुचंबणा होते.

दुरुस्तीसाठी प्रस्ताव
मांडवा जेट्टीवरील असुविधांबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाला विचारले असता, मांडवा जेट्टीवरील प्रवासी जेट्टीचे आयआयटी मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून शासनाकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. ते काम निविदा काढून लवकरात लवकर करण्यात येणार आहे. तसेच इतर सुविधांचा विचार करून पाठपुरावा केला जात आहे, असे सांगण्यात आले. तर सागरी सुरक्षा निरीक्षण पोलिस चौकी बंद असल्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

IPL Records : तिलक वर्माची १८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी, मुंबई इंडियन्ससाठी झळकावले Fastest Hundred; अनेक पराक्रम

SCROLL FOR NEXT