सर्व नगरसेवकांना समान निधी द्या
भाजप अध्यक्षांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षांनी केला असतानाच आता भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही असमान वाटपावरून नाराजी व्यक्त केली आहे. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात वाटप करण्यात आलेला अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांना समान निधी वाटप करण्यात यावे, असे पत्र त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना लिहिले आहे.
पालिकेच्या २०२६-२७च्या ८० हजार ९५२.५६ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. स्थायी समितीत मंजुरी देतानाच ८०० कोटींचा विकास निधीही मंजूर केला. मात्र ८०० कोटींच्या निधी वाटपात विरोधकांची काही लाखांवर बोळवण केल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. निधी वाटपात अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त निधी वाटप केल्याचे १६ एप्रिलपूर्वी निदर्शनास येताच याची सविस्तर माहिती घेतल्याचे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले आहे.
...
समान न्यायाचे तत्त्व राबवा!
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काही नगरसेवकांना देण्यात आलेला अतिरिक्त निधी रद्द करून सर्व नगरसेवकांमध्ये समतोल व न्याय्य निधी वाटप करण्यात यावे, असे साटम यांनी पत्रात नमूद केले आहे. सार्वजनिक निधी वाटपामध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि न्यायाचे तत्त्व राखणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, असे साटम यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.