आरटीई प्रवेशाला पुन्हा मुदतवाढ
पालकांना दिलासा; प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू
मुंबई, ता. २० : राज्यातील खासगी व्यवस्थापनांच्या शाळांतील आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक पालकांना प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत येणाऱ्या अडचणींचा विचार करून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढवली आहे.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षांतील आरटीईच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवड झालेल्या मुलांना २० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. अनेक पालकांना या मुदतीत प्रवेश घेता आले नाहीत. यामुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंत राज्यभरातील आठ हजार ७०१ शाळांत उपलब्ध असलेल्या एक लाख १४ हजार ८२६ जागांपैकी एक लाख पाच हजार ८११ जागांची या प्रवेशासाठी निवड झाली होती. त्यापैकी आतापर्यंत ३५ हजार २३६ प्रवेश पूर्ण झाले आहेत. यात सर्वाधिक प्रवेश हे ठाणे जिल्ह्यातील तीन हजार ३७५ इतके असून, त्याखालोलाख पुणे जिल्ह्यात दाेन हजार ८८७ तर मुंबईत दाेन हजार ४७५ जागांवर आणि अहिल्यानगरमध्ये दाेन हजार २३६ इतके झाले आहेत. सर्वात कमी प्रवेश हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ ७२ आणि रत्नागिरीत ९२ इतके झाले आहेत.
--
पालकांची धावाधाव
आरटीई प्रवेशासाठी पूर्वी एक किलाेमीटर अंतराची अट ठेवण्यात आली होती. त्यात बदल करून ती पूर्ववत तीन किमीपर्यंत करण्यात आली. यामुळे भाडेकरारांवर राहणाऱ्या पालकांची मोठ्या अडचणी झाल्या. अनेकांना ऐनवेळी नव्याने भाडेकरारही करावे लागले. काहींचा भाडेकरार हा नंतर करण्यात आल्याने प्रवेशासाठी निवड होऊनही ते प्रवेश करण्यासाठी कागदपत्रे पडताळणीत ते नाकारले जात असल्याचे प्रकार समोर आले. यामुळे अनेक पालकांना नाहक त्रास सोसावा लागत असल्याचे आप पालक युनियनचे प्रमुख मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.