चारचाकी विहिरीत कोसळली
दोघांना बाहेर काढण्यात यश; जीवितहानी नाही
नालासोपारा, ता. २० (बातमीदार) ः नालासोपाऱ्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक चारचाकी टॅक्सी २० ते २५ फूट खोल विहिरीत कोसळल्याची धक्कादायक दुर्घटना आज घडली. येथील संतोषी माता मंदिराजवळ दुपारी १च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसून, दोन जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने मद्यप्राशन केले होते. या अपघातात समोर असलेला संरक्षक कठडा तोडत चारचाकी २० ते २५ फूट खोल विहिरीत पडली. या विहिरीत पाणी असल्याने चारचाकीमधील दोघांचे जीव वाचले. ते दोघे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळावर पोहोचून उपकरणांच्या मदतीने जखमी दोघांना बाहेर काडले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने चारचाकी बाहेर काढण्यात आली.
-------------
चारचाकीतील दोघांनीही मद्यप्राशन केले होते. त्यामुळे नियंत्रण सुटून हा अपघात झाला. दुर्घटनेच्या परिसरातील स्थिती नियंत्रणात आणली आहे.
- सचिन कांबळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.