मुंबई

मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पावरून रहिवासी आमने-सामने

CD

‘मोतीलाल नगर’वरून रहिवासी आमने-सामने
जनकल्याणकारी समिती, रहिवासी विकास संघ बाजू मांडणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : मोतीलाल नगर पुनर्विकासांतर्गत रहिवाशांना १,६०० चौरस फुटाचे घर देण्याचा आराखडा म्हाडाने तयार केला आहे. त्यास मोतीलाल नगर विकास समितीकडून विरोध केला जात असला, तरी मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समितीने आपण म्हाडा प्रशासनासोबत असल्याचे स्पष्ट केले. त्याबाबत उद्या मंगळवारी आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून रहिवासी आमने-सामने येणार असल्याचे दिसत आहे.
मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाबाबत म्हाडाकडून सादरीकरण केले जात असतानाच काही व्यक्तींनी जाणूनबुजून अडथळा निर्माण केला. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना उद्देशून चिथावणीखोर वर्तन केल्याचा आरोप मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवासी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समितीने केला आहे. पुनर्विकास सर्व नागरिकांना हवा आहे. आम्हाला संबंधित प्रशासनासोबत समन्वयाने व पारदर्शकतेने काम करून पुनर्विकास प्रकल्प राबवून यशस्वी करायचा आहे. आम्ही तिन्ही संघटना मोतीलाल नगरच्या लोकांचा खरा आवाज असून त्याबाबत उद्या मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका मांडू असे संबंधित संघटनांनी स्पष्ट केले.
----------
जयस्वाल यांच्यावर कारवाईची मागणी
मोतीलाल नगर पुनर्विकासासंदर्भात रहिवाशांना माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी रहिवाशांबाबत अपमानास्पद भाषा वापरून गैरवर्तन केले. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन जयस्वाल यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांची बदली करावी अशी मागणी मोतीलाल नगर विकास समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

Navi Mumbai: सहा कोटींचा भार! वेतनवाढीचा पालिकेच्या तिजोरीवर आर्थिक ताण

IND vs IRE: आयर्लंडविरुद्धच्या करो या मरो सामन्यात 'हे' ३ खेळाडू ठरणार श्रेयस अय्यरचे हुकमी एक्के; मालिका वाचवण्यासाठी खास रणनीती!

SCROLL FOR NEXT