मुंबई

ठाण्यातील हुंडाबळी प्रकरण सीबीआयकडे

CD

ठाण्यातील हुंडाबळी प्रकरण सीबीआयकडे

तपासातील त्रुटींवर बोट ठेवून न्यायालयाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २० : हुंड्यासाठी तीन वर्षांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप असलेल्या प्रकरणाचा तपास नुकताच उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला. या वेळी पोलिसांच्या तपासात आणि आरोपपत्रात अनेक विसंगती आढळल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

संबंधित पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील काशीमिरा पोलिसांनी तपासात केलेल्या निष्काळजीबद्दल त्यांनी याचिकेतून चिंता व्यक्त केली होती. त्या याचिकेची दखल घेऊन पोलिस तपास आणि त्यावर दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक विसंगती गंभीर स्वरूपाच्या असल्याचे निरीक्षण न्या. सारंग कोतवाल आणि न्या. संदेश पाटील यांच्या खंडपीठाने नोंदवले. दुसरीकडे हा मृत्यू की आत्महत्या, हे न्यायवैद्यक अहवाल उपलब्ध नसल्यामुळे निश्चित मत व्यक्त करू शकत नसल्याचे पीडितेचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या जबाबात म्हटल्याची दखलही न्यायालयाने घेतली आणि निष्पक्ष आणि प्रभावी तपासासाठी हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

पीडितेचा विवाह नोव्हेंबर २०२१मध्ये झाला हाेता. मुलीचा हुंड्यासाठी छळ होत असून अनेकदा तिच्यावर शारीरिक हल्लाही करण्यात आल्यामुळे तिचा गर्भपात झाला हाेता. २३ फेब्रुवारी २०२३ला याचिकाकर्त्यांना मुलीने आत्महत्या केल्याचे समजले. मुलीच्या मृतदेहावर जखमांच्या खुणा आढळल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि काशीमिरा पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली पीडितेचा पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

पोलिसांवर आरोप काय?
पोलिसांनी अत्यंत अनिच्छेने गुन्हा नोंदवला. तसेच आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला नाही. आपला जावई फरार झाला असताना त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करून त्यानंतर जामीनही देण्यात आल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी याचिकेत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT