अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन
शिक्षकाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : हिरानंदानी इस्टेट परिसरातील एका शिकवणीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अल्पवयीन मुलगी ही हिरानंदानी इस्टेट येथील एका शिकवणीत लिपिक म्हणून काम करते, तर आरोपी हा तेथे मुलांना शिकविण्याचे काम करतो. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडिता या शिकवणीत कामावर आली असताना आरोपीने तिच्याशी जवळीक साधून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.