मुंबई

जात प्रमाणपत्रावरून सुरु असलेला वाद विरोधकांचे षडयंत्र

CD

जात प्रमाणपत्रावरील वाद षड्‍यंत्र
युनूस शेख यांचा विरोधकांवर आरोप

ठाणे, ता. २० : ठाण्यातील नगरसेविका सहर शेख या नुकत्याच जात प्रमाणपत्राच्या वादातून चर्चेत होत्या. या पार्श्वभूमीवर आज नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.
जात प्रमाणपत्र अधिकृत प्रक्रियेद्वारे सुमारे १५ वर्षांपूर्वी मिळाले असून, ते पूर्णपणे वैध आहे. कुटुंबाला जाणीवपूर्वक लक्ष्य करून चुकीचे आरोप लावले जात आहेत. जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेला वाद हा विरोधकांचे षड्‍यंत्र आहे, असा आरोप एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांचे वडील युनूस शेख यांनी या वेळी केला.
ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत मुंब्र्यात एमआयएमने पाच जागांवर विजय मिळवला. त्यात प्रभाग क्रमांक ३० (ब) मधून सहर शेख विजयी झाल्या. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्रावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या प्रकरणात काही राजकीय नेत्यांचा संबंध असून, प्रशासनाला हाताशी धरून कांगावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. न्याय मिळवण्यासाठी पुढील कायदेशीर पावले उचलून न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

आमच्याकडे सर्व कायदेशीर पुरावे
युनूस शेख यांनी पत्रकार परिषदेत कुटुंबातील सदस्यांची जात प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे सादर केली. सर्व कागदपत्रे वैध असून मुलीच्या विजयानंतर विरोधकांनी धसका घेतल्यामुळेच हा बनाव सुरू केल्याचा दावा त्यांनी केला. तक्रारदाराने बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप केला असला, तरी आमच्याकडे सर्व कायदेशीर पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकृत नोटीस न देता प्रक्रिया
उत्तर प्रदेशातील नातेवाइकांची जात प्रमाणपत्रेही पुरावा म्हणून सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. शासकीय यंत्रणेकडून कोणतीही अधिकृत नोटीस न देता प्रक्रिया राबवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय आयुक्तांच्या स्तरावर व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश

Vastu Tips : घरात खूप रखरख वाटते? 'या' 5 बिनकामाच्या वस्तू हिरावू शकतात तुमची शांती; खेचतात नकारात्मकता, कुटुंबात सतत वाद

Abhijieet Dipke यांच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन सुरु

T20 Squad: हार्दिक-कुलदीप आऊट! टीम इंडियाच्या घोषणेनंतर खळबळ; अजित आगरकरांनी सांगितलं संघाबाहेर करण्याचं कारण

Chandrapur: नागभीड तालुक्यात ३०.८७ कोटींचे पीककर्ज वितरण; शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचा पुढाकार

SCROLL FOR NEXT