विलेपार्ले येथे ‘आंबा महोत्सव २०२६’ला सुरुवात
२० एप्रिल ते २० मेदरम्यान मुंबई-ठाण्यात विविध ठिकाणी आयोजन
जोगेश्वरी, ता. २१ (बातमीदार) ः विलेपार्ले (पूर्व) परिसरात आयोजित ‘आंबा महोत्सव २०२६’चा उद्घाटन सोहळा सोमवारी (ता. २०) सायंकाळी उत्साहात पार पडला. सुभाष रोडवरील लक्ष्मीप्रसाद लॉन, राम मंदिर कंपाउंड येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आमदार पराग अळवणी, नगरसेविका अंजली सामंत, नगरसेवक मिलिंद शिंदे, सेवा भारती कोकण प्रांताचे अध्यक्ष विलास तावडे उपस्थित होते. कोकण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व खासदार विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
महोत्सव २० ते ३० एप्रिलदरम्यान विलेपार्ले (पूर्व) येथील लक्ष्मीप्रसाद लॉन येथे दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर १ ते १० मेदरम्यान ठाणे (पश्चिम) येथील गावदेवी मैदान आणि ११ ते २० मेदरम्यान बोरिवली (पश्चिम) येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदान येथेही महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांकडून थेट खरेदी
या महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध हापूससह विविध दर्जेदार आंब्यांची रेलचेल असून नागरिकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबे खरेदी करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.