मुंबई

२४ तासांचा ‘वॉटर शटडाऊन’ जाहीर

CD

उल्हासनगर (वार्ताहर) : उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील महत्त्वाच्या कामांमुळे तब्बल २४ तास वितरण बंद राहणार असल्याची माहिती उल्हासनगर पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परमेश्वर बुडगे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात बारवी गुरुत्ववाहिनी क्रमांक एक, दोन व तीनवर उन्नतीकरण व तातडीच्या देखभाल कामांसाठी शुक्रवारी (ता. २४) काम हाती घेतले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून ते शनिवार (ता. २५) दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता एस. एस. ननवरे यांनी दिली आहे. या बंदचा परिणाम उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या क्षेत्रांसह औद्योगिक वसाहती, नगर परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि आसपासच्या ग्रामपंचायतींवर होणार आहे.

---
गुरुवारी मिरा-भाईंदरला पाणी नाही
भाईंदर (बातमीदार) : एमआयडीसीने जांभुळ येथे जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामाकरिता २४ तासांचा शटडाऊन घेतला आहे. या काळात एमआयडीसीकडून मिरा-भाईंदर शहराला होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत मिरा-भाईंदर शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bar Association Election : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद निवडणुकीत पुण्याचा दबदबा; २३ पैकी तब्बल आठ उमेदवार विजयी

US Iran Conflict: अमेरिका-इराणचं पुन्हा पेटलं! यूएसच्या तळांवर इराणने डागले क्षेपणास्त्र; दोन्ही देशांमधला युद्धविराम धोक्यात

Karad Crime : वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने अभियंता पतीला कट रचून संपविले

Kuno Viral animal : दशकांनंतर कूनोच्या जंगलात दिसला रहस्यमयी 'प्राणी! कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली पहिली झलक, मुख्यमंत्र्यांनी शेअर केले photo

मोदी सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला; यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी अमरावतीत मशाली पेटल्या

SCROLL FOR NEXT