मुंबई

कुणबी समाजाला साधेपणाने विवाह करण्याचे आवाहन

CD

मुरबाड, ता. २२ (वार्ताहर) : तालुक्यातील कुणबी समाजात वाढत्या लग्नखर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजाने साधेपणा स्वीकारावा, असे आवाहन कुणबी संघटनेचे सल्लागार ह.भ.प. रामभाऊ दळवी यांनी केले आहे. लग्न समारंभ हा आनंदाचा सोहळा असला तरी त्यामध्ये होणारा अवाजवी खर्च टाळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः हळदी समारंभामध्ये शक्यतो शाकाहारी जेवण ठेवावे, अनावश्यक दिखाऊपणा टाळावा आणि वेळेचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच, लग्नातील विविध कार्यक्रमांमध्ये खर्चाची ठराविक मर्यादा पाळावी, अनाठायी स्पर्धा टाळावी आणि समाजात आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीने विवाह सोहळे पार पाडावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. रामभाऊ दळवी यांच्या या सूचनांचे समाजातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, आर्थिक शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud : व्हॉट्सॲप लिंक, बनावट ईमेल व ‘डिजिटल अरेस्ट’च्या आमिषाने पुण्यात ४८ लाखांची सायबर फसवणूक

LSG vs RR Live: वैभव सूर्यवंशीची दुसरी धाव अन् ग्लेन मॅक्सवेल, पृथ्वी शॉचा यांचा मोठा विक्रम मोडला! दिग्वेश राठीने भन्नाट झेल टिपला Video

Latest Marathi News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

Shirur Law & Order: : शिरूर तालुका नशामुक्तीसाठी तहसिलसमोर आठव्या दिवशीही सत्याग्रह; पोलिस प्रशासनावर निष्क्रियतेचे आरोप

Nilanga Crime : साडीने हातपाय बांधून तरुणाचा महिलेवर अत्याचार; माणुसकीला काळिमा फासणारी घटना, नराधम तरुण पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT