मुंबई

पालघरच्या १८०० शाळांमध्ये हजारो विद्यार्थी असुरक्षित

CD

१,८०० शाळांना धोका
सीसीटीव्ही अभावी विद्यार्थी असुरक्षित
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २१ ः राज्यभरात शाळांमध्ये विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत असताना आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये अद्यापही मूलभूत सुरक्षा यंत्रणा अपुरी आहे. विशेषतः जिल्ह्यातील १,८०० च्या जवळपास जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील आठ तालुक्यात २,११२ जिल्हा परिषद शाळांमध्ये १,५८,५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऑगस्ट २०२४ मध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिल्या आहेत. मात्र, दीड वर्षानंतर फक्त २५९ शाळांमध्ये कॅमेरे कार्यरत आहेत. तर १,८५३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. शाळेच्या परिसरात, वर्गखोल्यांमध्ये, प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही नसल्यामुळे अनुचित घटना घडल्यास त्याचा मागोवा घेणे कठीण होणार आहे. पालक व स्थानिक नागरिकांच्या मते, शाळा ही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित जागा आहे. त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याची मागणी होत आहे.
-----------------------
सर्वेक्षणाची तयारी
शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, काही शाळांमध्ये निधीअभावी, तर तांत्रिक अडचणींमुळे सीसीटीव्ही बसवण्याचे काम रखडले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करून टप्प्याटप्प्याने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच शाळांमध्ये सुरक्षा रक्षक, प्रवेश नोंदणी व्यवस्था, पालक-शिक्षक संवाद यंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.
------------------------
शिक्षण विभागाची अजब सूचना
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना जिल्हा प्रशासनाकडून निधी मंजूर करण्याऐवजी तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकाऱ्यांना लोकसहभाग, सामाजिक उत्तरदायित्व निधी घेऊन सीसीटीव्ही बसवण्याच्या अजब सूचना शिक्षण विभागाने दिल्याने कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
------------------------
तीन कोटींची तरतूद
जिल्हा नियोजन समितीकडून २०२४-२०२५ या वर्षात ३ कोटी ६० लाखाची तरतूद मंजूर झाली होती. या फंडातून ३९ शाळांना कॅमेरे बसवले होते. तर २०२६-२७ आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेच्या सेस फंडात तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
----------------------
शासन स्तरावरून निधी मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांना सीसीटीव्ही बसवण्यात येतील.
- सोनाली मातेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद पालघर
------------------
पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे गरज नसून अत्यावश्यक बाब आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
- काशिनाथ चौधरी, माजी जि.प. सदस्य

तालुका शाळा विद्यार्थी कॅमेरे कार्यरत शाळा
डहाणू - ४५६ ३९,३२३ ६२
जव्हार- २२६ १२,७६७ २०
मोखाडा - १५४ ९,१२७ १६
पालघर - ४०२ २१,८८९ १३
तलासरी - १५४ १८,९५१ ९
वसई - १९० २५,३०६ ३८
विक्रमगड - २३५ १५,०९४ २२
वाडा - २९५ १६,०९३ ७९
एकूण - २,११२ १५,८५५० २५९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT