मुंबई

उर्दू शाळांमध्ये बेकायदा शिक्षक भरती

CD

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : शहरात मोठ्या संख्येने खासगी उर्दू शाळेचे जाळे पसरले आहे. खासगी प्राथमिक शाळेत बेकायदा शिक्षक भरती झाली असून शिक्षणाचा दर्जा घसरत चालल्याची चिंता पालकांमध्ये पसरली आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि भिवंडी पालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

शासकीय अथवा खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकाने सरकारच्या शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परिक्षेमध्ये उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. मात्र शहरातील काही खासगी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती करताना टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या पदवीधरांची शिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. शहरातील नऊ प्राथमिक शाळांमध्ये एकूण ७० शिक्षकांची बेकायदा भरती करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक शिक्षकांना सेवा ज्येष्ठता दाखवून नेमले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना कोणताही अनुभव नाही. भिवंडीत काही प्राथमिक शाळांमध्ये सरकारची भरती प्रकियेचे आदेश दिले नसताना, संबंधित शाळा चालकांनी चुकीची कागदपत्रे बनवून बेकायदा ७० शिक्षकांची पदभरती केल्याचा आरोप फैज फरीद खान यांनी केला आहे.

पवित्र पोर्टलद्वारे भरती
शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी सौदागर शिखरे यांच्याशी संपर्क साधला असता, महापालिका शिक्षक भरती पवित्र पोर्टल शासनद्वारे केली जाते, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मध्य रेल्वेचा पुन्हा खोळंबा, सिग्नल यंत्रणेत बिघाड; रुळावर लोकलच्या रांगा, व्हिडिओ व्हायरल

Mumbai News : सीएसएमटीत चुकीच्या सिग्नलचा गोंधळ; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला, स्थानकप्रमुख निलंबित

IPL 2026, SRH vs DC: पॅट कमिन्सचं पुनरागमन नाहीच! हैदराबाद-दिल्ली संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मात्र मोठे बदल

Baramati By Election : सुनेत्रावहिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Latest Marathi News Live Update : गुजरात महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणू - खासदार संजय सिंह

SCROLL FOR NEXT