मुंबई

६५ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

CD

वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : वज्रेश्वरी परिसरात यात्रेच्या काळात घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता. १७) रात्रीच्या वेळी चोरट्याने घरफोडी करून सुमारे ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासह वज्रेश्वरी यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी घरात वयोवृद्ध आजीला ठेवून बाहेरील दरवाजाला कुलूप लावण्यात आले होते. रात्री उशिरा घरी परतल्यावर मागील दरवाजा उघडा, तसेच बाथरूमच्या छतावरील कौल उचकटलेले दिसून आले. यानंतर बेडरूममध्ये पाहणी केली असता लोखंडी कपाटाचे दरवाजे उघडे असून वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळल्या. तपासणीदरम्यान लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आले. या प्रकरणी गणेशपुरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT