मुंबई

लोणेरे येथे लॉजिंगमध्ये तरुणीची हत्या

CD

लोणेरे येथे लॉजमध्ये तरुणीची हत्या

माणगाव, ता. २१ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत लोणेरे येथील लॉजमध्ये एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमध्ये सोमवार (ता. २०) रूम नंबर १०१मध्ये ही घटना घडली. रूमची सफाई करण्यासाठी कर्मचाऱ्याने दरवाजा अनेक वेळा ठोठावूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब कर्मचाऱ्याने लॉजिंग चालकाला सांगितली. संशय आल्याने त्यांनी गोरेगाव पोलिस ठाणे येथे संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून गोरेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा ताबा घेतला. रूमचा दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लॅंकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली. पोलिसांनी ब्लॅंकेट हलवले असता धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेन्सिक पथक, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तरुणीचे अंदाजे वय २२ वर्षे आहे. ही तरुणीही गोरेगावनजीकच्या एका गावातील आहे. तरुणीची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून, आरोपीचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

तपासाला गती
खबरदारीचा उपाय म्हणून ओमकार रेसिडेन्सी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लॉजिंगमधील सीसीटीव्ही फुटेज आणि रजिस्टरमधील नोंदींद्वारे पोलिसांनी तपासाला गती दिली असून, लवकरच आरोपी पकडला जाईल, असे पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी सांगितले. आरोपी लवकरात लवकर पकडला गेला नाही तर मोठे जनआंदोलन उभारू, असे विकास गायकवाड आणि रवि मोरे यांनी सांगितले. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT