मुंबई

मेघगर्जनेसह ‘वळवाचा पाऊस’

CD

बदलापूर, ता. २१ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रचंड उष्णतेने हैराण झालेल्या बदलापूरकरांना आज (ता. २१) सकाळी निसर्गाने दिलासा दिला. पहाटेपासूनच आकाशात दाट ढग जमा होत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने शहराला झोडपून काढले. या अचानक कोसळलेल्या सरींमुळे परिसरात मातीचा दरवळ पसरला, तर तापमानात काहीअंशी घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला.

हवामान खात्याचे अभ्यासक अभिजित मोडक यांच्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी झालेल्या मेघगर्जनेसह पावसामागे खालच्या ते मध्यम स्तरावरील वाऱ्यांची अभिसरण प्रक्रिया कारणीभूत होती. या प्रक्रियेला वरच्या स्तरावरील पश्चिमी विक्षोभ याच्या प्रभावातून आलेल्या आर्द्रतेचा आधार मिळाल्याने ढगांची तीव्र निर्मिती होऊन वादळी पावसाला सुरुवात झाली. अशा प्रकारचा पाऊस साधारणतः अल्पकालीन असतो आणि तो पूर्वमॉन्सून काळातील वैशिष्ट्यपूर्ण हवामान घटना मानली जाते. या पावसाला ‘वळवाचा पाऊस’ असे संबोधले जाते. एप्रिलमध्ये या सरी कोसळल्याने हवामानातील बदल अधोरेखित होत असून, यंदा पावसाळ्याची लवकर चाहूल लागते आहे का, असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

मागील काही दिवसांत तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट, दमट हवा आणि अचानक बदलणारे वातावरण यामुळे उष्माघात, मळमळ, अशक्तपणा अशा तक्रारी वाढल्या होत्या. अशा स्थितीत मंगळवारी पावसाने नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला असून शहरात सुखद वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्या सरीतच वीज गायब
पावसाच्या सरींसोबत महावितरणचा वीजपुरवठा खंडित होण्याचा नेहमीचा पॅटर्न पुन्हा एकदा उघड झाला. मेघगर्जना आणि वाऱ्याचा थोडासा जोर झाला की वीज गायब होणे, हीच जणू अधिकृत कार्यपद्धती बनली आहे. नियमाप्रमाणे मंगळवारीदेखील सकाळपासून अनेक परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यातच प्रत्येकवेळी तांत्रिक कारणांचे ढाल पुढे करत जबाबदारी झटकली जात असली, तरी नागरिकांचा सवाल कायम आहे, ते म्हणजे पावसाळ्यापूर्वीची तयारी नेमकी कुठे जाते? वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

Latest Marathi News Live Update: बुधवारपर्यंत करार न झाल्यास इराणवर बॉम्बहल्ला करण्याची ट्रम्प यांची धमकी

Pune News : पालखी मार्गावरील केबल्स काढा; अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश

दुखापतींनी त्रासलेल्या CSK ला दिलासा मिळणार! MS Dhoni मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार... 'त्या' Video ने दिले संकेत

SCROLL FOR NEXT