मुंबई

घाऊक बाजारात लाल मिरची तडकली

CD

मिरचीचा ठसका वाढला!
घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात विक्रमी वाढ
वाशी, ता. २२ (बातमीदार) ः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वर्षभराचा मसाला साठवण्याच्या तयारीत असलेल्या गृहिणींचे आता आर्थिक बजेट कोलमडले आहे. घाऊक बाजारात लाल मिरचीच्या दरात किलोमागे २०० ते ३०० रुपयांची मोठी वाढ झाली असून, प्रामुख्याने बेडगी आणि काश्मिरी मिरचीने उच्चांक गाठला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दर ३० ते ४० टक्क्यांनी वधारल्याने ग्राहकांसह व्यापारी वर्गही चिंतेत पडला आहे.
विशेषतः जानेवारी ते एप्रिल हा मिरचीचा मुख्य हंगाम असतो. या काळात दररोज मोठ्या प्रमाणावर मिरची बाजारात येते. मात्र, यंदा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पावसाचे अनियमित प्रमाण आणि उष्णतेची तीव्रता वाढल्याने मिरची पिकावर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादन कमी झाले आणि बाजारात मालाची आवक घटली. परिणामी, उपलब्ध मालावरच जास्त मागणी आल्याने दर वाढले. या दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही झाला असून ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या मसाल्यांचा खर्च वाढल्याने स्वयंपाकघराचे बजेट बिघडू लागले आहे. लहान हॉटेल्स, खानावळी आणि मसाला उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसत आहे. पुढील काही आठवड्यांत नवीन मालाची आवक वाढल्यास दर काही प्रमाणात स्थिर होऊ शकतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही काळ महागाईचा सामना करावा लागणार आहे.

मसाला उद्योगातील वाढती मागणी
मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मसाले तयार करण्याचे प्रमाण वाढते. घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर मिरचीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. लोणचे, मसाले आणि इतर खाद्यपदार्थांसाठी मिरचीची गरज वाढल्याने बाजारात मागणीचा ताण निर्माण झाला आहे. वाहतूक खर्चात झालेली वाढ, साठवणुकीचे खर्च आणि व्यापाऱ्यांकडून केले जाणारे साठेबाजीचे व्यवहार यामुळेही दरवाढीला हातभार लागल्याचे बोलले जात आहे. काही व्यापाऱ्यांनी भविष्यात दर आणखी वाढण्याच्या शक्यतेने साठा करून ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिरचीचा प्रकार सध्याचा दर (रु.)
काश्मिरी मिरची ६५० ते ८०० रुपये
कर्नाटक बेडगी ३८० ते ४२० रुपये
तेजा / गुंटूर २३० ते २८० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran ceasefire : इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची शस्त्रसंधी धुडकावली; हॉर्मुझमध्ये गोळीबार, भारताकडे येणारे जहाज IRGC ने घेतले ताब्यात

नवरदेव ऐनवेळी फरार, नवरीचे लग्न धाकट्या दिराशी लावले, पण आता वडिलांच्या अजब मागणीने सगळेच चक्रावले

"इतकी मोठी माणसं असूनही त्यांना गर्व नाही" मटका किंग फेम विजयने केलं मराठी सहकलाकारांचं भरभरून कौतुक

Latest Marathi News Live Update: लग्न जुळत नसल्याने बुलडाणा जिल्ह्यात दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

लक्षणे नाहीत तरीही धोका मोठा! वयाच्या 45 नंतर ‘या’ कॅन्सरची तपासणी का गरजेची?

SCROLL FOR NEXT