मुंबई

ट्रामा रुग्णालयातील आंदोलन ६ व्या दिवशीही सुरूच

CD

कूपर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली
ट्रॉमा रुग्णालयातील आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयातील कामगारांचे कामबंद आंदोलन गेल्या सहा दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी झालेल्या बैठकीनंतरही कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर ट्रॉमा रुग्णालयाशी संलग्न असलेल्या कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देवीदास शेट्टी यांची रेडिओलॉजीचे विभागप्रमुख या मूळ विभागात बदली करण्यात आली आहे. कामगारांच्या समस्या सोडवण्यात आणि हे आंदोलन हाताळण्यात डॉ. शेट्टी अपयशी ठरल्याचा ठपका प्रशासनाकडून ठेवण्यात आल्याची चर्चा आहे.
कामगारांच्या कामबंद आंदोलनाच्या प्रश्नावर सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रशासनाने कामगारांप्रती भूमिका घेत प्रलंबित दोन महिन्यांचा पगार आणि तीन महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी तीन महिन्यांत अदा केला जाईल, त्या बदल्यात कामगारांनी कामावर रुजू व्हावे, असे आश्वासन दिले; प्रशासनाचा हा प्रस्ताव कामगारांना अमान्य केला. आमचा प्रश्न केवळ दोन-तीन महिन्यांचा नसून गेल्या २७ महिन्यांचा पीएफ निधी थकीत आहे. तसेच किमान तीन महिन्यांचा थकीत पगार लगेच मिळावा, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा घेतल्याने मंगळवारी सहाव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते.
---
रुग्णांची ससेहोलपट
गेल्या सहा दिवसांपासून रुग्णसेवा विस्कळित झाली असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची ससेहोलपट होत आहे. तातडीच्या शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सेवांवरही परिणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

IND vs AFG, Playing XI: भारतीय संघाने जिंकला टॉस, रवींद्र जडेजाच्या जागेवर पदार्पण करणारा मानव सुतार कोण?

Khan Sir Patna Controversy: पोलिसांनी रात्रभर घेतला शोध, खान सर पळत राहिले; कोचिंग गुरूला अटक होणार? की न्यायालयात आत्मसमर्पण?

कारने धडक देताच दुचाकीवरील चौघे हवेत उडाले, चिमुकलीसह चौघांचाही जागीच मृत्यू; घटनास्थळी रक्ताचा सडा

IND VS PAK: भारताचा पाकिस्तानवर हॉकीत रोमहर्षक विजय; आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT