मुंबई

कार्लेखिंड येथे दोन एसटीची समोरासमोर धडक

CD

दोन एसटी बसची धडक

अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड परिसरात अलिबागहून जळगावकडे जाणारी आणि पनवेलहून अलिबागकडे येणारी अशा दोन बस समोरासमोर धडकल्या. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन्ही बसचे नुकसान झाले आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग आगारातून सकाळी जळगावकडे बस निघाली होती. अलिबागमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने वातावरण धूसर होते. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कार्लेखिंड येथे आल्यावर चालकाने एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पनवेलहून अलिबागकडे जाणारी बस समोरून आली. या दोन्ही बस समोरासमोर धडकून अपघात झाला. या बसमधील ३४ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती एसटी बस आगारातून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT