मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याची सुटका
ठाणे : कोपरी परिसरातील आनंद नगर येथे झाडावर मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याची ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. मंगळवारी (ता. २१) केदारेश्वर मंदिराजवळ ही घटना घडली. याबाबत नागरिक नरेश ओमले यांनी माहिती दिली होती. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी समन्वयाने कारवाई करत झाडावर अडकलेल्या कावळ्याची सुरक्षित सुटका केली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.