मुंबई

शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : राज्यभरातील प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी व निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा ठाणे जिल्ह्यात मोठा परिणाम दिसून येत आहे. मंगळवार (ता. २१)पासून सुरू झालेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे १२ हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले असून अनेक शासकीय कामकाजांवर त्याचा परिणाम झाला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या आवारात कर्मचारी ठिय्या आंदोलन करत असल्याने दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा वेग मंदावला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्येही उपस्थिती कमी असल्याने शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व सेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याची स्थिती आहे. कर्मचारी संघटनांच्या मते, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारकडून वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. याआधीही आंदोलने करूनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.

आंदोलनामागील प्रमुख मुद्दे
कर्मचारी संघटनांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, रिक्त पदे भरणे, निवृत्तीवेतनासंदर्भातील धोरण स्पष्ट करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, तसेच भरतीवरील निर्बंध हटवणे या मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय शिक्षकांसंबंधी धोरणांमध्ये बदल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT