मुंबई

एपीएमसीतील क्लॉक टॉवर बंद

CD

एपीएमसीतील क्लॉक टॉवर बंद
चुकीची वेळ दाखवत असल्याने नागरिकांत संताप
वाशी, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने एपीएमसी परिसरात उभारण्यात आलेला क्लॉक टॉवर सध्या बंद असून, त्यातील घड्याळ चुकीची वेळ दाखवत असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही या मुद्द्यावर सभागृहात प्रश्न उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे.
वाशी-तुर्भे मार्गावरील एपीएमसी येथील कै. रामदास जानू पाटील चौकात सुमारे १४ मीटर उंचीचा हा क्लॉक टॉवर उभारण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी पालिकेने सुमारे १७ लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. मुंबईतील राजाबाई क्लॉक टॉवरच्या धर्तीवर हा टॉवर उभारण्यात आलेला आहे.
सध्या टॉवरमधील घड्याळे बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. योग्य देखभाल आणि वेळेवर दुरुस्ती न झाल्याने पालिकेच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
प्रशासनाची भूमिका
क्लॉक टॉवर बंद असल्यास त्याची चौकशी केली जाईल. तसेच दोष आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्पष्ट केले.

Meta Layoffs : AI आणि ऑटोमेशनचा दबाव वाढला! Meta मध्ये मोठ्या बदलांची सुरुवात; नव्या प्लॅनमध्ये ८,००० नोकऱ्या धोक्यात

Sharad Pawar: शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत; शेअर केली भावनिक पोस्ट

MI vs CSK: चेन्नईचा आता मुंबईशी सामना, पण IPL 2026 मधून बाहेर झालेल्या आयुष म्हात्रेची जागा घेणार कोण? हे आहेत ३ पर्याय

Post Result Anxiety: 90-95% गुण मिळूनही मुलं आनंदी का नाहीत? ‘पोस्ट-रिझल्ट अँझायटी’ म्हणजे काय आणि पालकांनी काय करावं?

Latest Marathi News Live Update : सीएसएमटीच्या स्टेशन मास्तरवर निलंबनाची कारवाई

SCROLL FOR NEXT