मुंबई

आरटीई प्रवेशासाठी पालकांना दिलासा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत संथ गतीमुळे शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत पालकांना अतिरिक्त वेळ दिला आहे. यापूर्वी २० एप्रिलपर्यंत असलेली कागदपत्र पडताळणी व प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच सुट्ट्यांचा कालावधी आल्याने प्रक्रिया प्रभावीपणे राबवता आली नाही. परिणामी, अपेक्षित प्रमाणात प्रवेश निश्चित झाले नसल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेऊनच शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातून लाखो अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती; मात्र दिलेल्या मुदतीत तुलनेने कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना संधी मिळावी, यासाठी ही मुदतवाढ महत्त्वाची ठरली आहे. पालकांनी विलंब न करता ३० एप्रिलपर्यंत सर्व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: होर्मुझमध्ये कडक नाकाबंदी; तरीही सुटका! जहाजांचे कॅप्टन इराण आणि अमेरिकेला कसा चकवा देतायेत? ५ गुप्त मार्ग उघड

MI vs CSK Live : संजू सॅमसनचे खणखणीत शतक! मुंबई इंडियन्सवर पडला भारी, IPL 2026 मधील 'Chetta'ची दुसरी Century

US Iran Tensions : युद्ध पुन्हा भडकणार? हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी उडवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

IPL 2026 News: दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात १८ वर्षांचा स्टार दाखल; T20 वर्ल्ड कप स्पर्धेत पठ्ठ्याने गाजवलेली एक मॅच, आता धमाल येणार

Solapur Crime News: जुन्या वादातून १८ वर्षीय सुजित राठोडचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा मृतदेहासह पोलीस ठाण्यात ठिय्या

SCROLL FOR NEXT