आरोग्य सेवा अधिक प्रभावी करा
बाह्य सेवांची नीट अंमलबजावणी करा ः आबिटकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यातील आरोग्य सेवा अधिक चांगल्या आणि परिणामकारक करण्यासाठी बाह्य यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सेवांची योग्य अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
मंत्री आबिटकर यांनी सांगितले, की आरोग्य संस्थांनी तपासण्यांसाठी बाह्य संस्थांवर पूर्णपणे अवलंबून न राहता स्वतःकडे ‘इन-हाऊस’ तपासण्या वाढवाव्यात. तसेच अनावश्यक तपासण्या टाळाव्यात आणि बाह्य संस्थांकडून होणाऱ्या तपासण्यांची गुणवत्ता नियमित तपासावी.
रुग्णांना वेळेत तपासणी अहवाल मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी आरोग्य उपसंचालकांनी ठोस योजना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावपातळीवर हृदयविकाराशी संबंधित ‘स्टेमी’ प्रकल्प प्रभावीपणे राबवावा. तसेच त्याचा अधिक प्रचार करून जास्तीत जास्त रुग्णांना फायदा मिळवून द्यावा, असेही त्यांनी सांगितले. या कामाचा दरमहा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी ‘ई-संजीवनी’ टेलिकन्सल्टेशन सेवा अधिक प्रभावीपणे राबवावी, असेही त्यांनी नमूद केले. रुग्णालयांमध्ये यांत्रिक वस्त्र धुलाई (लाँड्री) व्यवस्था सुरू करावी आणि स्वच्छतेसंबंधी अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.
या बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील जिल्हा पातळीवरील अधिकारी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.