उल्हासनगर, ता. २१ (वार्ताहर) : शहरातील एका गॅस एजन्सीमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. गॅस ग्राहकांकडून अतिरिक्त वसुली करण्यासाठी एजन्सी व्यवस्थापनाकडून दबाव टाकला जात होता आणि त्याला नकार दिल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी उल्हासनगरच्या शिधावाटप अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
एजन्सीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १९ एप्रिलला रात्री कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊन कामावरून काढून टाकले. याबाबत कारण विचारले असता, व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना प्रत्येक गॅस ग्राहकाकडून अतिरिक्त शुल्क वसूल करण्यास सांगितले होते. सध्या कर्मचारी अडीचशे रुपये घेत असून त्यातील रक्कम व्यवस्थापनाला दिली जाते, मात्र ही रक्कम वाढवून ४०० रुपये करा, अशी मागणी केली होती. या कामाला नकार दिल्यानेच आमचा ''काटा'' काढण्यात आला, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
शंकर कांबळे, महेंद्र जाधव, अनिल डोंगरे, सनी गायकवाड, दत्ता डोंगरे या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. याप्रकरणी गॅस एजन्सीवर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर उपोषणाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
ओटीपीचा घोटाळा केल्याचा दावा
गॅस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सर्व दावे फेटाळत कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच वेळा ओटीपीचा घोटाळा केला जात होता. त्यामुळे नियमांनुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.