मुंबई

पनवेल महापालिकेतीस सर्वसाधारण सभेच्या प्रक्षेपणावर बंदी

CD

पनवेल महापालिकेतीस सर्वसाधारण सभेच्या प्रक्षेपणावर बंदी
परवानगीशिवाय समाज माध्यमांवर प्रसारणास मनाई
पनवेल ता. २०( बातमीदार ) : पनवेल महापालिकेच्या सभागृहातील सर्वसाधारण सभेच्या थेट प्रक्षेपणावर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. नागरिक तसेच पत्रकारांसाठी नाट्यगृहाच्या बाल्कनी कक्षात बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली, तरी सभेचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह ब्रॉडकास्ट) समाज माध्यमांवर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या प्रसिद्ध परिपत्रकानुसार, काही नागरिक व पत्रकार फेसबुक किंवा यूट्यूबवरून सभेचे थेट प्रसारण करत असल्याचे निदर्शनास आले होते. ही कृती सभा नियम व शिष्टाचारांना अनुसरून नसल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, यापुढे सभागृह परिसरात पीठासीन अधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणालाही थेट प्रक्षेपण करता येणार नाही. तसेच, परवानगीशिवाय प्रसारण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, सभेचे अधिकृत थेट प्रक्षेपण करण्यासाठी इच्छुकांनी आवश्यक माहिती व अर्ज जनसंपर्क विभागाकडे सादर करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापौर व पीठासीन अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय अमलात आणण्यात आला असून, यामुळे सभेतील शिस्त व नियमांचे पालन अधिक काटेकोरपणे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप नगरसेवकांच्या बसचा अपघात, नियंत्रण सुटलं अन् हॉटेलच्या भिंतीला धडकली

Abhijeet Dipke: मोठी बातमी! कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, नेमकं काय घडलं?

MNGL Fraud : एमएनजीएल गॅस बिल अपडेटच्या बहाण्याने महिला वकिलाची ४.९८ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Latest Marathi News Live Update : जोपर्यंत मी राहील तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहील- वाजे

MNGL Fraud : एमएनजीएलच्या नावाने व्हॉट्सॲप एपीके फाईल; १३ रुपयांच्या बहाण्याने क्रेडिट कार्डवरून ३.६४ लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT