मुंबई

लाखो नागरिकांची तपासणी व उपचार

CD

राज्यात आरोग्य मोहिमांना गती
लाखो नागरिकांची तपासणी व उपचार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : राज्यात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी होत असून, लाखो नागरिकांना तपासणी, उपचार आणि आरोग्यसेवांचा लाभ मिळाला आहे. ३१ मार्च २०२६पर्यंत सिकलसेल, बाल व मातृ आरोग्य, क्षयरोग, कुष्ठरोग आणि असंसर्गजन्य आजारांवर विशेष मोहीम राबवून आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची प्रगती साध्य झाली आहे.
‘अरुणोदय’ सिकलसेल अभियानांतर्गत २१ जिल्ह्यांत ७४ लाखांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात २,३७६ रुग्ण आणि ३९,५४५ वाहक आढळले. बालआरोग्य कार्यक्रमांतर्गत ६०५ हृदय शस्त्रक्रिया आणि ४,२८१ इतर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

मातृ आरोग्य मोहिमेत ६,३९३ गरोदर महिलांची तपासणी करून ५,७०४ महिलांना उपचार देण्यात आले. हत्तीरोगासाठी ५६३ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. गडचिरोलीत ‘मलेरियामुक्त’ अभियानांतर्गत १.२१ लाख नमुने तपासून २३१ रुग्ण आढळले.
क्षयरोग रुग्णांसाठी ५.३८ लाख फूड किटचे वितरण करण्यात आले, तर कुष्ठरोग प्रतिबंधासाठी ५.०३ लाख सहवासीतांची तपासणी करण्यात आली. तसेच असंसर्गजन्य आजार मोहिमेत २६ हजार शिबिरांतून ३० लाख नागरिकांची तपासणी करून १.७३ लाख उच्च रक्तदाब आणि १.१० लाख मधुमेह रुग्णांचे नव्याने निदान झाले.

मातृ आरोग्याच्या दृष्टीने तीव्र रक्तक्षय असलेल्या गरोदर महिलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. राज्यातील ६,३९३ गरोदर मातांची तपासणी करून त्यापैकी ५,७०४ मातांना आयर्न सुक्रोज किंवा फेरिक कार्बोक्सी माल्टोज उपचार देण्यात आले. या उपचारांमुळे मातामृत्यू कमी होण्यास आणि सुरक्षित प्रसूतीस मोठी मदत होत आहे.

हत्तीरोगाने बाधित रुग्णांसाठीही शस्त्रक्रिया मोहिमेला वेग देण्यात आला. २०२५ मध्‍ये सर्वेक्षणांतर्गत एकूण १,७६५ अंडवृद्धी शस्‍त्रक्रियेकरिता पात्र रुग्‍णांची नोंद करण्‍यात आली. त्‍यापैकी डिसेंबर २०२५ अखेर एकूण ४६६ अंडवृद्धी शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. माहे जानेवारी २०२६ ते मार्च २०२६ या कालावधीमध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या विशेष मोहिमेअंतर्गत १,२८९ पात्र रुग्‍णांपैकी ५६३ रुग्‍णांवर अंडवृद्धी शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरीत्‍या करण्‍यात आल्‍या.
या सर्व उपक्रमांमुळे राज्यातील आरोग्यसेवांची गुणवत्ता आणि पोहोच वाढली असून ‘सर्वांसाठी आरोग्य’ या उद्दिष्टाच्या दिशेने राज्याची वाटचाल अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT