मुंबई

तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलासा;

CD

‘ई-निरसन’ प्रणालीचा शुभारंभ
तंत्रज्ञान विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई, ता. २१ :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी ‘ई-निरसन’ ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली विकसित केली आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  सेवा अधिक सुलभ व पारदर्शक देण्याचा हा प्रयत्न असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मंत्रालयात प्रणालीचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते   करण्यात आले. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, कुलगुरू डॉ. राजनीश कामत, परीक्षा नियंत्रक डॉ. नरेंद्र जाधव, तसेच कुलसचिव डॉ. शेष उपस्थित होते. ही प्रणाली (ॲप) विद्यापीठाच्या संगणक शाखेचे माजी विद्यार्थी स्वरूप कुलकर्णी, अमित बोभाटे व त्यांच्या तांत्रिक टीमने विद्यापीठाची सर्वंकष गरज लक्षात घेऊन विकसित केली आहे. त्यामध्ये पुढील काळात एआयआधारित अहवाल व विश्लेषणाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या गरजेनुसार सुधारणा करण्यात येणार आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,   विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी ‘ई-निरसन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित ही प्रणाली तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण करून त्या संबंधित विभागाकडे तत्काळ पाठवते. ज्या विद्यार्थ्यांना शुल्क आधारित सेवा मिळवायच्या असतील त्यांना ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे शुल्क भरून घरबसल्या सेवा मिळवता येणार आहेत.
यात विद्यार्थ्यांना तक्रारीची सद्यस्थिती ‘लाइव्ह ट्रॅकिंग’द्वारे पाहता येते. या प्रणालीमुळे तक्रार निवारण प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक व कार्यक्षम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. लाइव्ह ट्रॅकिंग व पूर्ण पारदर्शकता-तक्रार नोंदल्यानंतर विद्यार्थ्याला एक विशिष्ट ‘तक्रार क्रमांक’ मिळतो. या क्रमांकाच्या साहाय्याने विद्यार्थी ॲपवर आपल्या तक्रारीची सद्यःस्थिती कधीही, कुठूनही तपासू शकतो, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
--
एसएमएस, ईमेलवर सूचना
‘ई-निरसन’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांनी आपली तक्रार कोणत्या विभागाकडे आहे, कोण हाताळत आहे आणि कधी सोडवली जाईल, या सर्व माहितीचे रियल-टाइम अपडेट मिळतात. प्रत्येक टप्प्यावर एसएमएस व ईमेलद्वारे विद्यार्थ्याला सूचना दिली जाते.
--
परीक्षांची कामे सुरळीत
तंत्रज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेताच कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी विद्यापीठात मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निकालांवर लक्ष दिल्याने विद्यापीठातील बहुतांश निकाल आणि त्यांचे कामकाज सुरळीत आल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT