मुंबई

‘सूर हरपले’ कार्यक्रमाद्वारे आशा ताईंना श्रद्धांजली

CD

‘सूर हरपले’ कार्यक्रमाद्वारे आशा ताईंना श्रद्धांजली

​अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अंबरनाथमधील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी एकत्रित येत ‘संगीत पार्क’ येथे ‘सूर हरपले’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या पुढाकाराने आयोजित या शोकसभेत अंबरनाथ संगीत सभा, अंबर भरारी, रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, एक्स सर्विसमन असोसिएशन, योगिनी महिला मंडळ आणि हेरंब सेवा समिती या संस्थांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसाद मुदवेडकर, सुनील चौधरी आणि इतर मान्यवरांच्या प्रास्ताविकाने झाली, ज्यामध्ये आशाताईंच्या सांगीतिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
​याप्रसंगी केवळ भाषणांतूनच नव्हे, तर त्यांच्या अजरामर गीतांतूनही आदरांजली वाहण्यात आली. मनोहर दांडेकर, नीलिमा जोशी, विम्मी खन्ना यांच्यासह अनेक स्थानिक रसिकांनी आशाताईंची गाणी सादर केली, तर प्रमोद रानडे व सुरेखा कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रज्वल मुदवेडकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात डॉ. गणेश राठोड, दत्ता घावट, अभय सोमण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शेवटी निखिल चौधरी यांनी आभार मानले आणि आशाताईंचे गीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. या भावूक सोहळ्याला मोठ्या संख्येने अंबरनाथकर संगीतप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT