मुंबई

खाजगी कौशल्य विद्यापीठांच्या प्रस्तावांसाठी छाननी समिती

CD

प्रस्तावांसाठी छाननी समिती
खासगी कौशल्य विद्यापीठांसाठी १२ जणांची समिती
मुंबई, ता. २१ ः राज्यात कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर खासगी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी खासगी संस्थांकडून सादर केल्या जाणाऱ्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने समिती जाहीर केली आहे. विभागाच्या अप्पर सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीत १२ जणांचा समावेश आहे.
ही समिती कायम स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर खासगी कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात शासनास प्राप्त होणाऱ्या संस्था, प्रायोजक मंडळांच्या सविस्तर प्रकल्प अहवालांची छाननी करणार आहे. यात वित्त, नियोजन, महसूल, उद्योग इत्यादी विभागांतील अप्पर मुख्य सचिवांचा समावेश आहे. तर निमंत्रित सदस्य म्हणून राज्य रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरूंचाही समावेश आहे.
छाननी समितीचे अध्यक्ष हे कौशल्य विकास क्षेत्रातील सखोल ज्ञान व अनुभव असलेल्या एका तज्ज्ञ व्यक्तीला निमंत्रित सदस्य म्हणून समितीच्या बैठकीला आमंत्रित करू शकतील. छाननी समितीमधील सर्व निमंत्रित सदस्यांना मतदानाचा अधिकार असणार नाही. या समितीकडून महाराष्ट्र खासगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०२४ मधील कलम ४ नुसार विहित केलेल्या नियमानुसार विभागाकडे प्राप्त झालेल्या सर्व प्रस्तावांची तपासणी केली जाईल. तसेच आलेल्या प्रस्तावांमध्ये संबंधित संस्था, मंडळे इत्यादींची आर्थिक सुस्थिती आणि प्रस्तावित विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्यांच्याकडे असलेली क्षमता तपासून त्यासाठीचा अहवाल विभागाला देईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT