प्रतिज्ञापत्र का सादर केले नाही?
‘अग्निवीर’प्रकरणी न्यायालयाचे केंद्राला खडेबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : ऑपरेशन सिंदूरदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या अग्निवीर मुरली नाईकच्या कुटुंबीयांनाही भारतीय सैनिकांच्या कुटुंबीयांप्रमाणे लाभ मिळण्याबाबत कोणती पावले उचलली, त्याबाबत आदेश देऊनही अद्याप उत्तर सादर का केले नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली. तसेच यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची ही शेवटची संधी आहे; अन्यथा कठोर पावले उचलू, असेही न्यायालयाने सुनावले.
याप्रकरणी १७ जानेवारीला केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली होती. तेव्हापासून तीन महिने उलटले तरीही केंद्र सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले नाही. कागदपत्रे दिल्ली, मुंबई आणि पुणे अशी फिरत असल्याने उत्तर सादर करण्यात विलंब झाल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. प्रकरण गेल्या वर्षीपासून न्यायप्रविष्ट आहे, तरीही प्रतिज्ञापत्र सादर का करण्यात आले नाही, अशा शब्दात न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने केंद्र सरकारला जाब विचारला. तसेच जर ६ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल न केल्यास मोठा दंड ठोठावला जाईल, असा इशारा देताना सुनावणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. त्यासोबतच राज्य सरकारलाही प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश देऊन सुनावणी १८ जूनला सूचीबद्ध केली.
...
मागणी काय?
१. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी सैन्याने ९ मे रोजी पूंछ येथे युद्धबंदीचे उल्लंघन करून केलेल्या हल्ल्यात मुरली नाईक शहीद झाले होते.
२. अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर आणि भारतीय सैनिकांमध्ये भेदभाव केल्याचा दावा मुरली नाईक यांची आई ज्योतीबाई नाईक यांनी याचिकेतून केला आहे. हा भेदभाव मनमानी, पक्षपाती असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
३. अग्निवीर अन्य भारतीय सैनिकांसारखेच कर्तव्य बजावताना जोखीमही पत्कारतात. शहीद अग्निवीराच्या कुटुंबीयांना जवळपास एक कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळते; मात्र पेन्शन किंवा इतर लाभ, भत्ता मिळत नाही. त्यांचेही कुटुंबीय सर्व लाभ मिळण्यास पात्र असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
४. अग्निवीरांच्या कुटुंबीयांनाही मरणोत्तर भत्ते देण्याऱ्या सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याची प्रमुख मागणी याचिकेत केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.