मुंबई

अटल सेतू ते मुंबई पुणे एक्सप्रेस वे दरम्यानच्या कनेक्टरचे काम जोरात

CD

अटल सेतू ते द्रुतगतीच्या
जोडमार्गाचे काम जोरात!

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग थेट जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) ७.३५ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकांचा जोडमार्ग उभारला जात आहे. या मार्गाचे काम जोरात सुरू असून १४३ ठिकाणी पाया उभारणी पूर्ण केली असून १४१ ठिकाणी पियर्स आणि ६५३ गर्डर्सची उभारणी केली आहे. हा जोडमार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.
एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या जोडमार्गाच्या अभियांत्रिकी अचूकता आणि कामाचा वेग या दोन्ही बाबी प्रगतिपथावर आहेत. पळस्पे परिसरात स्लिप रोड आणि सर्व्हिस रोडच्या रुंदीकरणाचे कामही सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुणेदरम्यान जलद वाहतूक शक्य होणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सहजपणे जाता येणार आहे.
----
जोडमार्गामुळे मुंबईकरांना अटल सेतूमार्गे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सिग्नलविरहित प्रवास करता येईल. मुंबई आणि पुणेदरम्यानचा प्रवासही अधिक जलद आणि सुलभ होईल.
- डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त, एमएमआरडीए

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

Pune Nala Safai : नालेसफाईची ३० टक्के कामे पूर्ण; ५० कोटींच्या निविदांना स्थायी समितीची मंजुरीच नाही, पुणेकरांमध्ये प्रश्नचिन्ह

Pune Hording : पुण्यात आणखी ४२०० होर्डिंगचा घाट; ठेकेदाराला ७०% नफा, शहर विद्रूप होण्याची भीती

SCROLL FOR NEXT