मुंबई

गावकऱ्यांसमोर बिबट्याने बालकाचे लचके तोडले

CD

गावकऱ्यांसमोर बिबट्याने बालकाचे तोडले लचके
शहापुरातील हृदयद्रावक घटना

शहापूर, ता. २१ ः नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही वनविभागाने दुर्लक्ष केल्याने शहापूरच्या कळभोंडे येथील लाद्याची वाडीमधील १० वर्षांचा बालक आज (ता. २१) अखेर बिबट्याचा भक्ष्य बनला. कृष्णा आगिवले असे या आदिवासी मुलाचे नाव असून घराजवळ खेळत असताना बिबट्याने झडप घालून जंगलात नेले आणि त्याचे लचके तोडले. धक्कादायक बाब म्हणजे, वनविभागाचे अधिकारी तासाभराने रिकाम्या हाताने आले. तेव्हाही बिबट्या तेथेच होता. अखेर दगडाने मारून त्या बिबट्याला हिसकावून मुलाचा छिन्नविच्छीन्न मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८-९च्या सुमारास कृष्णा आगिवले हा आपल्या घराजवळील परिसरात खेळत होता. या वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेबद्दल कळताच अख्खा गाव जमा झाला. त्यांनी बिबट्यामागे धाव घेतली. बिबट्या बालकाला फरपटत जंगलात घेऊन गेला. त्याच्या मागोमाग गावकरीही पोहोचले; पण पुढचे दृश्य हतबल करणारे होते. गावकऱ्यांच्या डोळ्यादेखत बिबट्या बालकाचे लचके तोडत होता.
बालकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तासाभरानंतर घटनास्थळी पोहोचले. त्या वेळीही बिबट्या तेथेच ठाण मांडून होता; पण बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे नव्हती. बिबट्याच्या तावडीतून कृष्णाचा मृतदेह कसा मिळवायचा, हा प्रश्न होता. अखेर दगड मारून त्या बिबट्याला हिसकावण्यात आले. कृष्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेमुळे आगिवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
...
गावकऱ्यांचा संताप
अनेक दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर सुरू असल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला वारंवार दिली होती. यापूर्वीही बिबट्याने सुमारे १० जनावरे व कुत्र्यांचा बळी घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावर कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने निष्पाप बालकाचा बळी गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी तसा जाब वनविभागाला विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्नही केला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तत्काळ बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
...
आदेशाला केराची टोपली
वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच वनमंत्री गणेश नाईक यांनी शहापूरला भेट देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते; मात्र त्या सूचनांकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
...
बळी गेल्यानंतर हमी
बिबट्याच्या हल्ल्यात नव्हे तर वनविभागाच्या दुर्लक्षपणाचा बळी कृष्णा ठरला, असा संताप आता व्यक्त होत आहे. त्यामुळे हा बळी गेल्यानंतर झोपी गेलेले वनविभाग जागे झाले असून हा परिसर भयमुक्त करण्याची लेखी हमी वनविभागाने गावकऱ्यांना दिली आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेत आधीच्या तक्रारींकडे डोळेझाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT