मुंबई

पालिका, पोलिसांकडून न्यायालयीन आदेशांना केराची टोपली

CD

पालिका, पोलिसांचा आदेशांकडे कानाडोळा
बेकायदा फेरीवाल्यांबाबत उच्च न्यायालयाचे खडेबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : मुंबईत रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात बस्तान मांडणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने वारंवार आदेश दिले आहेत; मात्र महापालिका आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागायची, अशी विचारणा मंगळवारी (ता. २१) उच्च न्यायालयाने केली.
न्यायालयाने वारंवार आदेश देऊनही पालिका आणि पोलिसांकडून त्याकडे कानाडोळा केला जातो आणि फेरीवाल्यांची समस्या ‘जैसे थे’ असल्याचे न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने सुनावले. दोन्ही प्रतिवाद्यांनी अधिकाऱ्यांकडून आवश्यक त्या सूचना घेऊन आदेशांचे पालन कसे करणार, त्याबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करा, असे आदेश न्यायालयाने महापालिका आणि पोलिसांना दिले. 
तत्पूर्वी, कारवाईनंतर अधिकारी गेल्यावर फेरीवाले पुन्हा तिथे परततात, अशी हतबलता महापालिकेने व्यक्त केली. कारवाईनंतर फेरीवाले पुन्हा परतणार नाहीत यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असल्याचे सांगण्याचा प्रयत्नही केला. महापालिकेच्या युक्तिवादाला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. पोलिसांकडून गस्त घातली जात असताना महापालिका अधिकारी सोबत असणे आवश्यक आहे. महापालिका अधिकारी घटनास्थळावरून निघून जाऊ शकत नाही, असा प्रतिदावा सरकारी वकिलांनी केला. त्यावर पाहणीसाठी जाणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी योग्य ते संरक्षण उपलब्ध करावे, कोणालाही इजा होणार नाही, हे फेरीवाले पुन्हा तिथे परत येणार नाहीत याची तुम्ही खात्री करावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.
---
सीएसएमटी ते कुलाबा पाहणी करा
दुपारच्या सुमारास पालिकेकडून मिळालेल्या माहितीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयीन मित्र (अमायकरी क्यूरी) सायरस मिस्त्री यांना पालिका अधिकारी आणि पोलिस अधिकऱ्यांसोबत सीएसटीएम ते कुलाब्यापर्यंत पाहणी करण्याचे आदेश दिले. त्यासाठी संबंधित पोलिस ठाण्याच्या गस्त घालणाऱ्या तुकडीला न्यायालयात बोलावले आणि मिस्त्री यांना पाहण्यासाठी घेऊन जाण्यास सांगितले.
----
पाहणीत काय दिसले?
- सीएसएमटी ते फ्लोरा फाउंटन परिसरात फारसे अनधिकृत फेरीवाले नाहीत.
- बहुतांश फेरीवाल्यांकडे वैध परवाने
- कुलाबा कॉजवे येथे सर्वाधिक अवैध फेरीवाले
- काही फेरीवाल्यांकडे अवैध परवाने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT