दुसऱ्या दिवशीही लोकलगोंधळ
आधी ब्लाॅक, नंतर चुकीच्या सिग्नलमुळे वाहतूक ठप्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई/डोंबिवली, ता. २१ ः खर्डी रेल्वे स्थानकातील रात्रीचा लांबलेला ब्लॉक आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी लोकलचा डबा घसरल्यानंतर मंगळवारी सकाळी अचानक घेतलेल्या ब्लॉकमुळे सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. त्यातच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी दुपारी चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल समोरासमोर आल्याची परिस्थिती निर्माण झाली; परंतु मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. या गोंधळामुळे सीएसएमटीच्या चारही फलाटांवरील लोकल वाहतूक २५ मिनिटे ठप्प झाली. यामुळे आज दिवसभर मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेकांनी रस्तेमार्गे ठाणे गाठून मग पुढचा प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याने माणकोली उड्डाणपूल, कल्याण-शिळ रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
डोंबिवली स्थानकावर सकाळी ८.०५ ते ८.३५ या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २वर ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. आधीच विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे फलाट क्रमांक ३ आणि ५वर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवरही हीच परिस्थिती होती. कर्जत, बदलापूर, कल्याण, टिटवाळा, आसनगाव आणि कसारा मार्गावरील गाड्या आधीच भरून येत असल्याने प्रवाशांना गाडीत चढण्यासाठी अक्षरशः झुंजावे लागले. कार्यालयात पोहोचण्यास उशीर होण्याची भीती, लेट मार्कचा दबाव आणि उकाड्यातील गर्दीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. डोंबिवलीत गर्दी असताना गाड्या कल्याणहून का सोडल्या, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.
...
स्थानकप्रमुख निलंबित
मध्य रेल्वे प्रशासनाने या गंभीर प्रकाराची दखल घेत सीएसएमटीच्या स्थानकप्रमुखाला तत्काळ निलंबित करण्यात आले. सिग्नल देण्यात नेमकी चूक कुठे झाली, जबाबदारी कोणाची आणि सुरक्षा प्रक्रियेत त्रुटी कशा राहिल्या, याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेमागे मानवी चूक कारणीभूत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.