मुंबई

‘एस-३ पार्क’ मृत्यू प्रकरणाला कलाटणी आत्महत्या प्रकरणी भगवान लोटेविरोधात गुन्हा दाखल !

CD

‘एस-३ पार्क’ मृत्यूप्रकरणी भगवान लोटेवर गुन्हा दाखल
अंबरनाथ, ता. २१ (वार्ताहर) ः अंबरनाथ पश्चिम येथील ‘एस-३ पार्क’ हॉटेलमध्ये १० एप्रिलला घडलेल्या २६ वर्षीय सिमरन पाटील हिच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी भगवान सुभाष लोटे (३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत सिमरनची आई रजनी पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भगवान लोटे याने सिमरनला प्रेमसंबंधातून आपल्या जाळ्यात ओढले. त्यानंतर आपल्या कार्यालयात अकाउंटंट म्हणून नोकरीस ठेवले. तिच्याकडून कथितपणे बेकायदा आर्थिक व्यवहार करून घेतले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सिमरनने हे काम सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरोपीने तिला वारंवार धमक्या देत मानसिक त्रास दिला, असेही तक्रारीत नमूद आहे.
घटनेच्या दिवशी आरोपीने ‘एस-३ पार्क’ हॉटेलमध्ये स्वतःच्या नावाने रूम बुक करून सिमरनला तेथे बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर फोन व इतर माध्यमांतून तिला मानसिकदृष्ट्या त्रास देण्यात आला. याला कंटाळून सिमरनने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सुरुवातीला ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आणि अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर २१ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रुपाली साळवे करीत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT