मुंबई

''दशावतार'' ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे दिमाखदार प्रकाशन

CD

‘दशावतार’च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन
मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेशाचीही घोषणा

विरार, ता. २२ (बातमीदार) : आरती आर्ट अकादमी, वेताळ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात आयोजित केलेले तिसरे दशावतारी नाट्यसंमेलन अभूतपूर्व गर्दीत आणि उत्साहात पार पडले. रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे हे संमेलन पूर्णपणे हाऊसफुल झाले होते. या सोहळ्यात ज्येष्ठ संशोधक ॲड. डॉ. अशोक भाईडकर यांच्या आणि डिंपल पब्लिकेशन प्रकाशित ‘दशावतार’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि ‘द ग्रेट इंडियन फोल्क ड्रामा : दशावतार’ या इंग्रजी पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी एक मोठी घोषणा केली. दशावतारावर इतके सखोल संशोधन करणारे हे ग्रंथ आता मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे या लोककलेचा शास्त्रीय अभ्यास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. अशोक भाईडकर यांनी आपल्या भाषणात युवा साहित्यिकांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या नावाने त्यांनी शिष्यवृत्ती सुरू करण्याचेही या वेळी जाहीर केले, जेणेकरून युवा प्रतिभेला साहित्यात वाव मिळेल.
------------
याच कार्यक्रमात लेखिका श्रुती रसाळ यांचा ‘युवा साहित्यिक’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला.
संमेलनाचे अध्यक्ष यशवंत तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात दशावतारी नाटकांच्या प्रयोगांनी रंगत आणली. संमेलनाला मिळालेला हाऊसफुल प्रतिसाद आणि जाहीर झालेले ऐतिहासिक निर्णय यामुळे हे संमेलन दशावतारी कलेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT