मुंबई

उर्दू माध्यमाच्या शाळेच्या इमारतीची दुरावस्था

CD

शाळेच्या इमारतीची दुरवस्था
निकृष्ट बांधकामामुळे छताला गळती, भिंतींना तडे

मनोर, ता. २२ (बातमीदार) : मनोर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीचे बांधकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले असून, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात छतामधून पाणी गळती होत आहे. यामुळे छताच्या दुरुस्तीसह इमारतीची रंगरंगोटी करण्याची मागणी जोर धरत आहे.

छतातून पावसाच्या पाण्याची गळती होत असल्यामुळे उर्दू माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्यांची दुरवस्था झाली आहे. काही वर्षांपासून इमारतीची रंगरंगोटी झालेली नाही. शाळा परिसराला संरक्षक कुंपण नसल्याने बाहेरील व्यक्तींचा वावर वाढला असून, लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. इमारत परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांना वावर असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नेहमीच भीती असते. शाळेच्या गच्चीवर संरक्षक भिंत नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळा आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी इमारतीचे बळकटीकरण, संरक्षक भिंत, रंगरंगोटी, स्वच्छता व्यवस्था तसेच शिक्षक भरती करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षिततेसाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
-------------------
शिक्षकांचा तुटवडा

मनोर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यम शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत १६७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सहा शिक्षकांची आवश्यकता असताना तीन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्याध्यापक पद अनेक वर्षांपासून रिक्त आहे. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
--------------------
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

मनोर ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडून गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण विभागाला अनेक वेळा लेखी पत्र देऊन समस्यांकडे लक्ष वेधले आहे. शिक्षण विभागाकडून कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायत स्तरावरून आश्वासने दिली जात असल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
-------------------
कोट
शाळेच्या इमारतीच्या छत दुरुस्तीसाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल. उर्दू माध्यमाचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विभागीय स्तरावरून शिक्षक उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
- सोनाली मातेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

Ranjangaon MIDC : रांजणगाव एमआयडीसीत मनसे कामगार युनियन स्थापनेवरून भाजप-मनसे आमनेसामने

SCROLL FOR NEXT