मुंबई

नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; मोठी दुर्घटना टळली

CD

नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; मोठी दुर्घटना टळली

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर १६-ए येथील वूडलँड सोसायटीमध्ये मंगळवारी (ता. २१) सायंकाळी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. पाचव्या मजल्यावरील फ्लॅटचा स्लॅब तुटून थेट चौथ्या मजल्यावरील घरात कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेच्या वेळी कुटुंबीय स्वयंपाकघरात असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचव्या मजल्यावरील फ्लॅटचा छताचा स्लॅब अचानक कोसळला. हा स्लॅब खाली चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आदळल्याने मोठा आवाज झाला आणि काही क्षणात धुळीचे लोट संपूर्ण इमारतीत पसरले. आवाज ऐकताच घाबरलेल्या रहिवाशांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. प्राथमिक पाहणीनंतर इमारतीची स्थिती धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाने इमारत तात्पुरती सील केली. बाधित कुटुंबांसाठी प्रशासनाने कुकशेत येथील मार्केट परिसरात तात्पुरत्या निवासाची व्यवस्था केली असून अन्न, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर इमारतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. इमारतीचे नियमित स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते का, दुरुस्तीबाबत दुर्लक्ष झाले होते का, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रहिवाशांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. महापालिका प्रशासनाने तज्ज्ञांकडून इमारतीची सविस्तर तपासणी करून अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: सनरायझर्स हैदराबादचा विजयाचा चौकार अन् Points Table मध्ये टॉप-३ मध्ये एन्ट्री; राजस्थान रॉयल्सला दिला धक्का

IPL 2026: अभिषेकच्या शतकानंतर मलिंगाचा विकेट्सचा 'चौकार'! हैदराबादचा दिल्लीवर दिमाखदार विजय अन् काव्या मारनचं सेलिब्रेशन

IPL 2026: १० सिक्स, १० फोर अन् शतक... Abhishek Sharma ने तब्बल ७ मोठे विक्रम केले नावावर; दिग्गजांच्या पंक्तीत स्थान

Solapur Mangrul News: मंगळवेढ्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप; तहसीलसह प्रमुख शासकीय कामकाज ठप्प, ग्रामीण नागरिकांचे हाल

Electric Bike News: जुनी ‘राजदूत’ बनली २०० किमी धावणारी इलेक्ट्रिक बाईक; बालाजी काकडे यांचा कमी खर्चात भन्नाट प्रयोग

SCROLL FOR NEXT