सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शहरात विविध विकास प्रकल्पांच्या नावाखाली सुरू असलेल्या बेसुमार वृक्षतोडीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात लवकरच पर्यावरण समितीची विशेष बैठक बोलावून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी येथे दिली.
वर्तकनगर येथील भाजपच्या जिल्हा विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ठाण्यातील पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास आणि नागरिकांमधून व्यक्त होणारी नाराजी या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी ही माहिती दिली. शहराचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. वृक्षतोडीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील पावले उचलली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विरोधकांवर टीका
संसदेच्या विशेष अधिवेशनात ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ बारगळल्याच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. ‘महिलांना त्यांचा हक्क नाकारणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. भविष्यात जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या विधेयकाला विरोध करणाऱ्यांना देशातील महिला कधीही माफ करणार नाहीत’, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण विधेयकाला खीळ घालणाऱ्यांविरुद्ध सर्वपक्षीय महिलांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरणार आहे. ही चळवळ देशभर सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.