मुंबई

वाड्यात महिलांच्या एकजुटीचा विजय!

CD

वाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील ५४ गावांतील तब्बल ८० पाड्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले होते. महिलांना दररोज लांब अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागत होते, तर अनेक ठिकाणी दूषित पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयासमोर दोन दिवस, एक रात्र आंदोलन छेडण्यात आले. अखेर प्रशासनाने पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रत्यक्ष कामांना सुरुवात केल्याने मंगळवारी (ता. २१) रात्री हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पाण्यासाठी नागरिकांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आल्याने संतापलेल्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. २०) पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांचा संताप आणखी तीव्र झाला. ‘आम्हाला आश्वासन नको, पाणी हवे’ अशा स्पष्ट शब्दांत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. महिलांनी आंदोलनस्थळी रात्रभर ठाण मांडून चुली पेटवत आपला लढा अधिक तीव्र केला. या एकजुटीमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला. वाढत्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने शिष्टमंडळासोबत चर्चा केली आणि केवळ लेखी आश्वासन न देता तातडीने पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली. तसेच, पुढील काळात पाणीटंचाई दूर करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला. या ठोस पावलांनंतर संघटनेच्या वतीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

या आंदोलनात जिल्हा महिला ठिणगी प्रमुख रेखा पऱ्हाड, तालुकाध्यक्ष भरत जाधव, तालुका सचिव सूरज दळवी, तालुका उपाध्यक्ष आदेश वाघ, सुजाता पारधी, देवेंद्र वाघ, बाळू लहांगे, सुगंधा विघ्ने यांच्यासह इतर पदाधिकारी, महिला सहभागी झाल्या होत्या.

...अन्यथा पुन्हा आंदोलन!
हा केवळ पाण्याचा नव्हे, तर आमच्या जगण्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यामुळे महिलांच्या लढ्याला खरे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच, ठरलेल्या कृती कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीचा प्रवास सोपा नव्हता; वडिलांनी सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गाव बंद

SCROLL FOR NEXT